Friday , October 18 2024
Breaking News

टीजेएसबी बेळगाव शाखेत कारसेवकांचा हृद्य सत्कार

Spread the love

 

बेळगाव : अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेत दि. 22 रोजी बेळगावातील काही कारसेवकांचा हृद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कारसेवक सर्वश्री कृष्णानंद कामत, रमेश चिकोर्डे, गजेश नंदगडकर यांचा स्तकारमूर्तीत समावेश होता. क्लस्टर हेड प्रमोद देशपांडे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, की बँकेच्या 136 शाखांमधून कारसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम होत आहे. त्यांचा सन्मान हे आमचे भाग्य आहे. त्यांना आलेले अनुभव ऐकण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा आमचा उद्देश आहे. कारसेवा कशी झाली, याचे थरारक क्षण आम्हाला स्फूर्तिदायक ठरतील.
श्री. कामत म्हणाले, की कारसेवा ही निरंतर चालत आलेली प्रक्रिया आहे. प्राणप्रतिष्ठा हा आमचा मुख्य हेतू नाही. आपला हिंदू समाज बलशाली आणि स्वयंपूर्ण होत भारत विश्वगुरु बनावा, हे यामागचे लक्ष्य आहे. रामराज्याच्या दिशेने उचलले गेलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बँक आणि राम यांचेही एक नाते आहे. सर्वसामान्यांना आर्थिक निर्भर बनवण्यासाठी सहकार क्षेत्र कार्यरत आहे. बँका हा त्याचाच एक भाग आहे. सर्व क्षेत्रात भारत अग्रेसर झाला पाहिजे. श्रीरामांनी पावलोपावली आदर्श निर्माण केले आहेत. सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करणे हे यापैकीच एक आहे. चिकोर्डे यांनी कारसेवेसाठीचा प्रवास, आलेले विलक्षण अनुभव सांगून बाबारी ढाचा कसा उद्ध्वस्त केला गेला, यामागचे परिश्रम कसे घेतले गेले याचे विवेचन केले. आपल्यात आक्रमकता असली पाहिजे, मवाळ होऊन चालणार नाही. अखंड सावधानता असली पाहिजे, यावर भर दिला. श्री. नंदगडकर यांनी बेळगाव ते अयोध्या कारसेवेचा प्रवास उलगडला. आम्हा सर्वांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह होता. आलेल्या प्रसंगांना तोंड देत आम्ही ते घुमट पाडूनच परतलो. परत येताना पुण्यात आमचा झालेला पहिला सत्कार होता. आज बँकेने आम्हाला बोलावून ते क्षण जागवण्याची संधी देणारी ही पहिली बँक आहे असे ते म्हणाले.
श्रीराम हा देशाचा प्राण आहे. ते आत्मतत्त्व आहे. या सेवकांनी कारसेवा केली. ते भाग्य आम्हाला मिळाले नाही. पण देशात रामराज्य येण्यासाठी आम्हाला कारसेवा करण्याचे सौभाग्य मात्र लाभले आहे, असे पत्रकार सुनील आपटे यांनी नमूद केले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रमोद देशपांडे यांनी कारसेवकांना सन्मानित केले. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पार्चन करण्यात आले. एबीएम सौ. सुजाता माने, सौरभ पाटील, राम सांबरेकर, केदार गोखले, सौ. स्वाती आपटे आदी कर्मचारी उपस्थित होते. देशपांडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *