Friday , October 18 2024
Breaking News

शिवसेनेच्या वतीने बेळगावात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

Spread the love

 

बेळगाव : शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी शांताई वृद्धाश्रम, बामणवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सानिध्यात हिंदू हृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला मिक्सर, ट्यूबलाइट्स आणि मिठाई भेटीदाखल देण्यात आली. सदर भेटीचा स्वीकार करून वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागचे आभार मानले. त्याचप्रमाणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, प्रकाश हेबाजी, आदींसह वृद्धाश्रमातील वयस्कर मंडळी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होते.

श्री मंगाईनगरतर्फे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

श्री मंगाईनगर वडगाव -बेळगाव येथील श्री मंगाईनगर रहिवासी संघाच्या वतीने हिंदू हृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर श्री मंगाईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर आणि उपाध्यक्ष श्रीधर बिर्जे यांच्या हस्ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी केरवाडकर यांनी आपल्या समायोचित भाषणात कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आनंद गोंधळी, किरण पाटील, मंगेश पोटे, श्याम छत्रे, अनिकेत नरगुंदकर, सुमित उचगांवकर, महेश हसबे, बाळू भोसले, प्रकाश हेब्बाजी, शिवाजी केरवाडकर, नारायण पवार, राम सांबरेकर, प्रशांत हणगोजी, नागेश कल्लेद, बाळू धामणेकर, सहदेव रेमानाचे आदींसह मंगाईनगर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *