मकर संक्रांती – श्रीराम मंदीर आनंदोत्सव
बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांती व श्रीराम मंदीर आनंदोत्सव असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी स्वामी विवेकानंद, श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रीशा व स्वरा मोरे यांनी सुमधुर श्रीराम स्तुती अप्रतिमपणे सादर केली. विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले.
अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी मकर संक्रांती विषयी विस्तृत महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्राचार्य व्ही. एन्. जोशी यांनी उद् बोधक विचार मांडले. स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरीत्र याविषयी स्वराली बिर्जे व वेदिका हुंदरे या विद्यार्थिनींची उत्कृष्ट भाषणे झाली. त्यानंतर भक्तीगीत व भजन गायन कार्यक्रम झाला.
स्वाती घोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव मालतेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्री नामजी देशपांडे, व्ही. एन्. जोशी, डॉ. वदिंद्र यलबुर्गी, रामचंद्र तिगडी, सुहास गुर्जर, विजयेंद्र गुडी, अमर देसाई, पी. जे. घाडी, उषा देशपांडे, लक्ष्मी तिगडी, उमा यलबुर्गी, तृप्ती देसाई, अक्षता मोरे, शालिनी नायक आदि उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.