
बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्न सीमावासियांनी खूप काही सोसला आहे. खूप काही भोगला आहे. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावाच लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि तिसऱ्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुकर भावे यांनी आज बोलताना केले.
येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात प्रगतिशील लेखक संघाच्या तिसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक आणि पत्रकार मधुकर भावे पुणे, उदघाटिका ज्येष्ठ मेधा सामंत-पुरव यांच्या हस्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्य व प्रतिमेच्या पूजन व मुनशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भालचंद्र कांगो, अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद मेणसे, सचिव कृष्णा शहापूरकर, माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना भावे म्हणाले, सीमा आंदोलनात तीन पिढ्या गारद झालेल्या आहेत. त्याग, सेवा आणि समर्पणातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. अनेकांच्या घाम रक्त आणि बलिदानाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला.
शाहीर अमर शेख गव्हाणकर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासंदर्भात समाजामध्ये जागृती करण्याचे मोलाचे कार्य केले. आचार्य अत्रे यांचे जीवन कार्य आणि एकंदरीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील योगदान अतिशय मोठे आणि प्रखर असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येते. बॅरिस्टर नाथ पै यांनी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राची घोषणा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संदर्भात अतिशय महत्त्वाचे भाषण लोकसभेत भाषण केलेले आहे ते अतिशय गाजलेले आहे. 1943 आले बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक ग. त्र्य. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडून बेळगाव सीमाभागातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. संयुक्त महाराष्ट्रमध्ये समाविष्ट होण्यासाठी बेळगावमध्ये पहिल्यांदा ठराव मांडण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करण्यासंदर्भात विशेष महत्त्व देणारे असे हे ठराव ठरले आहेत.
सीमा प्रश्न खूप काही सोसलं आणि सहन केलं आहे. आता या प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावाच लागेल. समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईला यावे. मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन ऍडव्होकेट जनरलला लढ्याच्या निर्धाराची कल्पना द्यावी. प्रसंगी मुंबईच्या हुतात्मा चौकात उपोषणाचा इशारा ही महाराष्ट्र सरकारला द्यावा लागेल, असेही भावे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रा. निलेश शिंदे, लता पावशे, अप्पासाहेब गुरव, कला सातेरी, प्रा. सुनंदा शेळके, जगदीश कुंटे, अर्जुन सांगावकर, ॲड. अजय सातेरी, मधू पाटील, शिवाजी कागणीकर, मधु कणबर्गी, गुणवंत पाटील, प्रा. सुरेश पाटील, प्रा. डॉ. डी. टी. पाटील, गजानन सावंत, शेखर पाटील, कीर्ती कुमार जोशी, उमेश पाटील, वैष्णवी पाटील, माजी नगरसेवक अनिल पाटील, मधु पाटील, सुभाष सुंठणकर, बसवंत शहापूरकर, प्रा. मयूर नागेनहट्टी, प्राचार्य आनंद देसाई, ज्योतिबा आगमनी, शिवानी पाटील, एल. जी. पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. अजय सातेरी, माजी आमदार दिगंबर पाटील, शिवाजी देसाई, श्रीधर पाटील, अजित पाटील, विजय पाटील, सुधीर लोहार, सागर गुंजीकर, सदानंद सामंत, प्रा. दत्ता नाडगौडा, सुभाष कंग्राळकर, नितीन आनंदाचे, संदिप मुतगेकर यासह वेगवेगळ्या संस्थातील पदाधिकारी सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.
अशोक अलगोंडी यांनी केले. आभार कृष्णा शहापूरकर यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta