बेळगाव : बेळगाव बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी झालेल्या सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उडुपी येथील कामाक्षी भट्ट आणि हेमंत भट्ट अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.