
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर, शिवाजी काॅलनी फुटबॉल क्लब आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर मुलांचा संघ अजिंक्य ठरला आहे. तर मुलींच्या गटात सेंट जोसेफ पेनल्टी शुटच्या आधारे अजिंक्य ठरला आहे
सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धा खूप उत्साहात संपन्न झाल्या केंद्रीय विद्यालयाने गतविजेत्या के.एल.एस. संघास हरवून उपांत्य फेरीत दाखल झाले चार एक अशा फरकाने.पूर्व उपांत्य सामन्यात हेरवाडकर स्कूल ने एक शून्य अशा फरकाने पराभव संत मीरा संघांचा करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर मुलांचा संघ केंद्रीय विद्यालय वर एकतर्फी चार शून्य अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं नाव पक्कं केलं.
अंतिम सामन्यात सेंट झेवियर संघाने उत्कृष्ट खेळ करत एम.व्ही. हेरवाडकर संघाला नमवून एक शून्य अशा गोल फरकाने विजय मिळवला व अजिंक्य आपण आहोत हे सिद्ध केले.
मुलांचा उपविजेता हेरवाडकर स्कूल, मुलींचा उपविजेता संघ सेंट झेवियर तसेच विजेता मुलींचा संघ सेंट जोसेफ व मुलांचा विजेता संघ सेंट झेवियर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव पत्र, चषक देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, श्रीकांत फगरे, राकेश कांबळे, सागर भोसले, पवन कांबळे, दीपा भंडारी, श्वेता खांडेकर, संतोष दळवी, विक्रम कदम, स्वप्नील पाटील, विशाल राऊत, जयराम बांदेकर, अमित पाटील, गोपाळ खांडे, विकी मन्नोळकर, मनोज खांडेकर, संजय कोल्हापूरे, शांतापा नरगोदी, जॅकीसर, हेब्बाळकर, विलास बसरीमरद आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्व.दिलीप कोल्हापूरे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
आकर्षक चषक राकेश कांबळे यांनी पुरस्कृत केले होते.
पंच म्हणून उमेश मजूकर, कौशिक पाटील, यश सुतार, सुदर्शन चौगले, अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले.
समालोचक निवृत्त शिक्षक वाय पी नाईक, विनायक धामणेकर शिरीष चौगुले यांनी काम पाहिले.
या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta