
येळ्ळूर : आशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हणमंत कुगजी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील नेरसा, हणबरवाडा, चाफा वाडा या तिन्ही गावातील प्राथमिक शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. खानापूर येथील दुर्गाम भागातील नेरसा, हणबरवाडा, चाफा वाडा, येथील गव्हर्मेंट मराठी शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच चाफा वाडा येथील नागरिकांना उत्तम प्रतीचे टॉवेल घरोघरी देण्यात आले. प्रत्येक वर्षी अभियंते हणमंत कुगजी आपल्या आशादीप वेल्फेअर सोसायटीच्या वतीने शैक्षणिक साहित्य बरोबरच गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करीत असतात. अशा सामाजिक उपक्रमातून अभियंते हणमंत कुगजी कायमच सामाजिक बांधिलकी जपत असतात. या प्रसंगी आशादीप वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष हणमंत कुगजी, नेरसा गावातील माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई व शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta