Thursday , March 5 2026
Breaking News

कॅपिटल वन आयोजित अखिल भारतीय एकांकिका लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : सातत्याने भासणाऱ्या तुटवडा व नवनवीन विषयाचा अभाव यामुळे अखिल भारतीय स्तरावर एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन संस्थेने सुरु केले.

पाचव्या वर्षी देशभरातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला व बऱ्याच लेखक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

सदर लेखन स्पर्धेचा निकाल श्री सांस्कृतिक दालनाच्या सदस्यांच्या उपस्थितीत नुकताच जाहीर करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल लेखक व शहर
प्रथम क्रमांक –
अरविंद गोविंद लिमये हरिपूर, सांगली
एकांकिका : आनंदाच गणितं

द्वितीय क्रमांक-
उदय दत्तात्रय गोडबोले –
हरिपूर सांगली
एकांकीका – मेघा रे मेघा

तृतीय क्रमांक
मेधा मराठे –
बेळगांव

एकांकीका-मनातल्या भुतांची ऐशी शी की तैशी

सदर परिक्षणाचे काम श्री सुभाष सुंठणकर, श्री. विनोद गायकवाड यांनी केले. संस्थेने एका पत्रकद्वारे या स्पर्धक व विजेत्यांचे अभिनंदन केले असून या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ एकांकिका स्पर्धेच्या बाक्षिस वितरणावेळी रविवार दि. 04 फेब्रुवारी रात्री 8 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *