
बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२४ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत.
ही स्पर्धा उद्या शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे होणार आहे.
ही स्पर्धा सीमाभाग मर्यादित असून तीन विभागात होणार आहे.
१) प्राथमिक विभाग इयत्ता ३ री ते ७ वी पर्यंत,
२) माध्यमिक विभाग ८ वी ते १० वी पर्यंत
३) महाविद्यालयीन विभाग (सीमाभाग व्यतिरिक्त आंतरराज्यीय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात) इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर( वयवर्षे २६ पर्यंत)
सामान्यज्ञान, शिवकालीन इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमाप्रश्न या विषयावर आधारित सदर स्पर्धा होणार आहे.
विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी झालेबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta