
बेळगाव : कै. चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती बेळगाव यांच्या वतीने नवोदित पुरूष व महिला कुस्तीपटूंसाठी प्रोत्साहनार्थ रविवारी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आनंदवाडी आखाडा येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर स्पर्धा रविवारी दुपारी ठीक ३ वाजता मैदानाला सुरवात होणार आहे. या मैदानात पुरूष गटात जवळपास ७० हुन आधिक कुस्त्या लावण्यात येणार आहेत. तर महिला गटात ११ हुन अधिक कुस्त्या लावण्यात येणार आहेत.
प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी विजेता भांदूर गल्ली तालीमचा पै. नागराज बशिडोनी ( मारूती घाडी यांचा पट्टा) विरूद्ध पै. बनिया पंजाब नॅशनल चॅम्पियन्स (अमृतसर आखाडा) दोन नंबर पै. करण पंजाब विरूद्ध पै. प्रकाश इंगळगी पै. बस्सु घोडगेरी यांचा पट्टा, तीन नंबर पै. ऋषिकेश भोसेकर सांगली विरूध्द पै. किर्तीकुमार बेनके ल. कंग्राळी चौथा क्रमांक पै. ऋषिकेश सावंत सांगली विरूद्ध पै. महेश लंगोटी कर्नाटक कुमार भांदूर गल्ली आखाडा तसेच पार्थ पाटील कंग्राळी, विजय सौदी, पृथ्वी पाटील, पवन चिकदीनकोप, रोहीत पाटील, मारूती शिंदे, विक्रम तुर्केवाडी, मल्लेश अथणी, महेश तिर्थकुंडे, यल्लाप्पा निरवानहट्टी, परशराम हरिहर, प्रथमेश हट्टीकर, प्रविण निलजी, हणमंत गंदीगवाड बेळगाव अशा एकूण ७० हुन आधिक लहान मोठ्या निकाली कुस्त्या लावण्यात येणार आहेत.
तर महिला गटात १) पै. कल्याणी अंबोळकर वाघवडे विरूद्ध पै. राधिका अनगोळ २) पै. समिक्षा धामणेकर यळ्ळूर विरूध्द श्रावणी तरळे आंबेवाडी ३) शितल खादरवाडी विरूद्ध भक्ती पाटील कंग्राळी ४) भक्ती गावडा मोदेकोप विरूध्द पै. प्रभा खादरवाडी ५) पै. जान्हवी पाटील किणये विरूध्द सिध्दी निलजकर कंग्राळी ६) ऋतुजा रावळ शहापुर विरूद्ध मनस्वी जायाणाचे मजगाव ७) दिया अनगोळ विरूद्ध तनुजा खानापुर ८) आदिती कोरे शहापूर विरूद्ध पूर्वा आंबेवाडी ८) प्रांजल बिर्जे अनगोळ विरूद्ध श्रृती खादरवाडी ९) आराध्य हलगेकर यळ्ळूर विरूद्ध समिधा बिर्जे वडगाव १०) पुर्वी लोकळुचे धामणे विरूद्ध सीया चव्हाण वडगाव यांच्यात निकाली कुस्त्या होणार आहेत तसेच मेंढ्याची कुस्तीही लावण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे गुरूवर्य परशूरामभाऊ नंदिहळ्ळी,
महांतेश कवठगीमठ, डॉ सोनाली सरनोबत, रमाकांत कोंडूसकर, किरण जाधव, राजेंद्र मुतगेकर, पी आर कदम, गोविंद टक्केकर, सदानंद बस्तवाडकर, कृष्णा शहापूरकर, सतिश पाटील, आर आय पाटील, मल्लिकार्जुन जगजंपी, नागेश सातेरी, गोविंद राऊत, प्रभु मठपती, एस आर देशपांडे, सदानंद शिनोळकर, कपिल भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta