बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी प्रबोधिनीचा हा रौप्य महोत्सवी मराठी भाषा दिन आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर वक्त्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही करण्यात येणार आहे. मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये यासंबंधी चर्चा करून नियोजन करण्यात आले. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या बैठकीमध्ये प्रबोधिनीच्या कार्यकारणी मधील नवीन सदस्यांची निवड ही करण्यात आली. यामध्ये नीला आपटे, गौरी ओऊळकर, हर्षदा सुंठणकर, प्रा. अशोक आलगोंडी, शिवराज चव्हाण, प्रा. सागर मरगाण्णाचे व स्नेहल पोटे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाष ओऊळकर, मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, बसवंत शहापूरकर, बी. बी. शिंदे, इंद्रजित मोरे, नारायण उडकेकर, गजानन सावंत व प्रसाद सावंत उपस्थित होते. आभार धीरजसिंह राजपूत यांनी मानले.