ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार
बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024 रविवार दि. 18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी निमंत्रण पत्रिकेचे अनावरण कार्यक्रम सोहळा मराठा मंदिरमध्ये रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव चौगुले उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, माजी नगरसेवक अनिल पाटील व नेताजी जाधव, नागेश झंगरूचे, नागेश तरळे, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे – पाटील, परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, प्रा. निलेश शिंदे, संजय मोरे, सूरज कणबरकर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवरांनी भाषणे केली.
स्वागत संजय गुरव यांनी केले. प्रास्ताविक परिषदचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी संमेलन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी एम. वाय. घाडी, ऍड. सौरवसिंह पाटील, स्मिता चिंचणीकर, गीता घाडी, प्रा. मनिषा नाडगौडा, डॉ. संजीवनी खंडागळे, रोशनी हुंदरे, नेत्रा मेणसे, स्मिता किल्लेकर यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक हितचिंतक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.