
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अनेक लोक दुप्पट पैशाच्या मोहात पडून लाखो रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी केले.
बेळगावात आज पत्रकारांशी बोलताना एसपी भीमाशंकर गुळेद म्हणाले की, जिल्ह्यातील जनता दुप्पट पैशाच्या हव्यासात पडली असून लाखो रुपयांच्या ऑनलाइन ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना जनतेने सावधगिरी बाळगावी, आपल्या जिल्ह्यातील सुमारे तीन जणांचे एका महिन्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते चिक्कोडी, गोकाक, निप्पाणी तालुक्यातील आहेत, हे सर्वजण सुशिक्षित आहेत, पहिली घटना ७२ लाख, दुसरी प्रकरण ५८ लाखांचे, तिसरे प्रकरण २५ लाखांचे आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले.पहिल्या प्रकरणात, व्यक्तीने फेसबुकवरील जाहिरातींवर विश्वास ठेवला आणि तो फसला. त्या व्यक्तीने ऑनलाइन योजनेवर विश्वास ठेवला आणि प्रथम १ लाख जमा केले. फसवणूक करणाऱ्याने ते अधिक व्याजासह परत केले. असे करून त्या व्यक्तीने त्याच्या मित्रांकडून पैसे घेतले, पत्नी आणि नातेवाईकांना ६० लाख त्या व्यक्तीला ५ लाख रुपये दिले, त्यानंतर ५ लाख जमा करून एकूण ७२ लाखांचे नुकसान झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta