
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या यशस्विनी सहकारी आरोग्य रक्षण योजनेचा लाभ मिळवून देण्याची सुविधा येथील सुप्रसिध्द आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीने सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. शहरी भागातील चार व्यक्तीच्या कुटुंबासाठी निवासी व्यक्तीकरिता एक हजार रुपये फी भरावयाची आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधार कार्डचे झेराँक्स, रेशन कार्डचे झेरॉक्स, आदर्श सोसायटीचे ओळखपत्र मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपर्यंत सोसायटीच्या नजिकच्या कार्यालयात जमा करावे व कार्यालयात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन चेअरमन एस. एम. जाधव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta