बेळगाव : येथील कलाश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर व विजया दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन बेळगाव यांच्याकडून हे घेयांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 20) रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी दिली. या शिबिरात विजया दक्षता हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबीर सकाळी 11 ते 4 या वेळेत उद्यमबाग येथील कलाश्री टॉवरच्या सभागृहात होणार असून या शिबिरात रक्तदाब, (बीपी) मधुमेह, (शुगर) हाडांची ठिसूळता तसेच अन्य विविध आजार व त्याबाबतचे मार्गदर्शन मोफत करण्यात येणार आहे. तसेच गरजूंना मोफत औषध ही वाटप करण्यात येणार आहे. व मोतीबिंदूचे ऑपरेशन कंडिशन बघून फ्री मध्ये करून देण्यात येणार आहे शिबिर उद्घाटन प्रसंगी विजय ऑर्थो सेंटरचे प्रमुख डॉ. रवी पाटील रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे प्रेसिडेंट सतीश नाईक कलाश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश डोळेकर उपस्थित राहणार आहेत.