बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशन येथे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
तालुका आरोग्य कार्यालयातील आशा कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या.
आशा कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना डॉ. सरनोबत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून अशीच समाजाची सेवा करत रहा असे सांगितले. समाजात अशा पद्धतीचे काम करणाऱ्या व्यक्तींप्रति आपण कृतज्ञ असले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर डॉ. सरनोबत तसेच फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ होत्या. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.
शिल्पा बुदीहाळ आणि जयश्री ढवळी प्रार्थना गीत सादर केले.
सुरुवातीला डॉ. देगीनाळ यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
उपस्थित पाहुण्यांचे तसेच आशा कार्यकर्त्यांचे स्वागत लक्ष्मी झेंडे यांनी केले.
यावेळी डॉ. देगीनाळ यांच्याहस्ते प्रमुख पाहुण्या डॉ. सरनोबत यांचा शाल स्मृतीचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर मकरसंक्रांती निमित्त खास करून आमंत्रित करण्यात आलेल्या आशा कार्यकर्त्यांना वाण देऊन तसेच हळदीकुंकू लावून सन्मानित करण्यात आले. यावेळी संजीवीनी काळजी केंद्रातील व्यक्तींनी तसेच कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी नृत्ये सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी तर आभार प्रदर्शन विजयालक्ष्मी पाटील यांनी केले.