
बेळगाव : नुकताच इचलकरंजी मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 22 सुवर्ण 16 रौप्य व 19 कांस्य अशी एकूण 57 पदके संपादित करून घवघवीत यश संपादन केले.
कुमार स्वरूप धनुचे, कुमारी वेदा खानोलकर, कुमारी दिशा होंडी, कुमारी आरोही चित्रगार यांनी आपल्या गटाचे वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावले.या स्पर्धेमध्ये इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, गोवा, पणजी मडगाव, बेळगाव येथील जलतरणपटुनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे
मुले ग्रुप1- कुमार स्वरूप धनुचे चार सुवर्ण एक रौप्य एक कास्य. कुमार तनुज सिंग एक सुवर्ण एक रोप्य दोन कास्य. कुमार आदी शिरसाठ ग्रुप 2 – एक सुवर्ण एक कांस्य. कुमार प्रजीत मयेकर एक सुवर्ण. ग्रुप 4- मोहित काकतकर चार रोप्य. अमोघ परमाज एक कास्य. ग्रुप 5 – अद्वैत जोशी एक 1 कास्य. सुप्रीत चिगरे एक कांस्य.ग्रुप 6- तक्ष गेंजी एक सुवर्ण एक रोप्य तीन कास्य. कुमार हर्षवर्धन कार्लेकर एक रोप्य तीन कास्य.
मुली गट क्रमांक 1- प्रणाली जाधव एक सुवर्ण एक रौप्य दोन कास्य. गट 2- कुमारी वेदा खानोलकर तीन सुवर्ण एक रोप्य एक कास्य. प्रिशा पटेल एक सुवर्ण. अनन्या रामकृष्ण एक सुवर्ण. गट 3- दिशा होंडी तीन सुवर्ण एक रौप्य एक कास्य. वैशाली घाटेगस्ती एक रौप्य. मुली गट 4- आरोही चित्रगार पाच सुवर्ण एक रौप्य. निधी मुचंडी तीन रोप्य एक कास्य. कुमारी अमूल्या केसतीकर एक कास्य.
वरील सर्व जलतरणपटूंना आबा क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, श्री. अमित जाधव, श्री. संदीप मोहिते, श्री. रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे चेअरमन ऍड. मोहन सप्रे, अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी, श्री. शितल हुलबत्ते यांचे प्रोत्साहन लाभते.
Belgaum Varta Belgaum Varta