
बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सेक्रेटरी अमित कुडतुडकर, वैशवानी युवा संघटना अध्यक्ष रोहन जवळी, सचिव रविकल कलघटगी, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी व सेक्रेटरी वैशाली पालकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी वैश्यवाणी समाज बांधव, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात सकाळी 6 ते 7 सनई चौघडा व काकड आरती नंतर पुरोहित गौतम भटजी व रामकृष्ण भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीला महाभिषेक त्यानंतर स्त्रीला मिष्टान्न व महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर श्री. समादेवीला ओटी भरण्यास प्रारंभ झाला. दुपारी पुराण वाचन झाल्यानंतर श्रीच्या पालखी प्रदक्षिणाला प्रारंभ झाला. पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली गोंधळी गल्ली गवळी गल्ली नार्वेकर गल्ली त्यानंतर श्री. समादेवी मंदिर येथे पालखीची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta