बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि नवचंडिका होम मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. श्री समादेवी मूर्तीला गौतम भटजी रामकृष्ण भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीला महाभिषेक घालण्यात आला. सकाळी ६:३० ते सकाळी 11 पर्यंत नागेश शास्त्री हेर्लेकर, निळकंठ हेर्लेकर, ऋषिकेश हेर्लेकर, भूषण काणे पुणे, जितेंद्र गरगट्टी कोल्हापूर पवन देशपांडे रामनगर रवी पुट्टा या नामवंत पुरोहितच्या मार्गदर्शनाखाली नवचंडिका होम करण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी महादेव गावडे व मंदा गावडे यांनी होम विधी करण्याचा मान मिळवला. याप्रसंगी राहुल गावडे व रचना गावडे यांनी होम करताना मदत केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित विश्वस्त मोहन नाकाडी व मोतीचंद दोरकाडी, वैश्य युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, सेक्रेटरी रवी कलघटगी, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी व सेक्रेटरी वैशाली पालकर आणि वैश्यवाणी समाज बांधव, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारच्या सत्रात महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.