Thursday , March 5 2026
Breaking News

करवे कार्यकर्त्यांचा पुन्हा धिंगाणा; इंग्रजी बॅनर, नामफलक फाडले

Spread the love

 

बेळगाव : करवेने येनकेन प्रकारे बेळगाव शहरातील व्यापारी-व्यावसायिकांना वेठीस धरणे सुरूच ठेवले आहे. कन्नड नामफलकांसाठी करवे शिवरामगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला.

बेळगावात व्यवसाय करणाऱ्या दुकानांच्या 60 टक्के नावाच्या पाट्या कन्नड भाषेत लिहाव्यात, यासाठी सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असली तरी ते लावले नसल्याच्या निषेधार्थ करवे शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करत इंग्रजी भाषेतील नामफलक, बॅनर्स हटविण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटक करून सोडण्यात आले. शहरातील बहुतांश दुकानांवर आजही परदेशी भाषेतील नावाच्या पाट्या आहेत. महापालिकेने नोटीस बजावूनही महाराष्ट्र एकीकरण समिती समूहातील काही लोक कन्नड नामफलक लावण्यास विलंब करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. बेळगावात व्यवसाय करणाऱ्या सर्वांनी कन्नड बोलावे आणि येथील जमीन आणि पाण्याचा आदर करावा आणि कन्नडकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वाजिद हिरेकुडी, कस्तुरी भावी, सविता, अरुण तेलगर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *