Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव शहराजवळ हत्तीचे दर्शन!

Spread the love

 

बेळगाव : आज शुक्रवारी सकाळी बेळगाव शहर परिसराजवळील अलतगा, बसव कॉलनी, कंग्राळी (बीके) येथे हत्तीचे दर्शन झाले.

हत्ती बसव कॉलनी परिसरात दिसल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्तीपर्यंत पोहोचला आहे.

बसव कॉलनी बॉक्साइट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला तर कित्येक जणांना भीती देखील वाटली यावेळी अनेकांनी हत्ती पाहायला गर्दी केली कित्येक जण आपल्या मोबाईलवर हत्तीचे चित्रण करून घेण्यात दंग होते.

जंगलातील हत्ती रहिवासी परिसरात दाखल झाल्यामुळे भीतीमुळे अनेकांनी वन खात्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. आपल्या घरच्या परिसरात हत्ती आल्याचे पाहून लहान या मुलांमध्ये आनंद व्यक्त होत होता.

वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार बसव कॉलनी परिसरात आलेला हत्ती काकतीच्या जंगलामधून अन्न किंवा पाण्याच्या शोधात शहराकडे आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वनखाते बसव कॉलनी परिसरात दाखल झाले असून हत्तीला पुन्हा जंगलाकडे हुसकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *