Wednesday , March 4 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे सचिव कै. के. बी. निलजकर यांची पुण्यतिथी साजरी

Spread the love

 

येळ्ळूर : कै. के. बी. निलजकर हे संस्थेच्या जडणघडणाच्या काळात माझ्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे होते. संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता के. बी. निलजकर हे जसे उत्तम प्रशासन होते तसेच ते नावाजलेले पैलवान व कृषी क्षेत्रातील जाणकार सुद्धा होते.
त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनावरूनच आज संस्थेची घोडदौड चालू आहे संस्थेला आजही त्यांची उणीव भासते असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री. वाय. एन. मजूकर यांनी काढले.
बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी श्री चांगळेश्र्वरी शिक्षण मंडळाचे माजी सचिव कै. श्री. के. बी. निलजकर यांचा पाचवा पुण्यस्मरण दिन श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे साजरा करण्यात आला.
माजी सचिव कै. के. बी. निलजकर यांच्या प्रतिमेला श्री. वाय. एन. मजूकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी विद्यमान सचिव प्रसाद मजुकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत यांनी सरांच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रायमरी शाळेचे व हायस्कूलचे सर्व शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *