
बेळगाव : बेळगावात दुकानांवर कन्नड पाट्या लावण्यासाठी महानगर पालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून दमदाटी केली. सकाळीसकाळीच लोकेश यांच्या नेतृत्वाखालील टीमने नामफलकांवर कन्नड न वापरणाऱ्या दुकानांना टाळे ठोकले. बेळगाव शहरातील व्यावसायिक दुकाने आणि दुकानांच्या समोरच्या नामफलकांवर सरकारी नियमानुसार ६० टक्के कन्नड न वापरल्याबद्दल त्यांनी नोटीस बजावली. मात्र, दुकानदारांनी त्याची दखल घेतली नाही. शहरातील फोर्ट रोड, पाटील गल्ली, खडेबाजार येथील दुकानांना शुक्रवारी सकाळी नामफलक काढून टाकून कन्नड मजकुराचे नवे बोर्ड बसवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta