
बेळगाव : हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे उद्या रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी तीन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कै. रामचंद्र टक्केकर व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ बांधकाम व्यवसाय व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी हे कुस्ती मैदान पुरस्कृत केले आहे.
प्रथम क्रमांकाची कुस्ती सेनादलाचा संग्राम पाटील विरुद्ध उदयकुमार दिल्ली तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळे विरुद्ध केशव भगत तसेच तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती परमानंद इंगळगी विरुद्ध सोनबा गोंगाणे, चौथ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदिनकोप्प विरुद्ध दयानंद घटप्रभा, पाचव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील विरुद्ध संतोष हारुगिरी यांच्यात होणार आहे.
याचबरोबर महिलांमध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती ऋतुजा रावळ विरुद्ध पूर्वा आंबेवाडी, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कल्याणी आंबोळकर विरुद्ध समीक्षा धामणेकर, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती दर्शना कोटबागी विरुद्ध सिद्धी निलजकर, चौथा क्रमांकाची कुस्ती संध्या गोडगेरी विरुद्ध अदिती कोरे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती श्रेया गोडगेरी विरुद्ध भक्ती गावडा यांच्यासह पंधरा क्रमांक प्रमाणे इतर लहान मोठ्या साठवून अधिक कुस्त्या रविवारच्या मैदानात होणार आहेत. या जंगी कुस्ती मैदानाचा लाभ बेळगाव आणि परिसरातील कुस्तीप्रेमींनी घ्यावा असे आवाहन गोविंद टक्केकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta