बेळगाव : 4 डिसेंबर 2023 रोजी कर्नाटकात सरकारच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी तालुका चंदगड येथे रस्तारोको केला होते. त्याप्रकरणी 20 समिती नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुधवार दि. 6 मार्च रोजी चंदगड पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश चंदगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी दिले आहेत.
कर्नाटक सरकारने हलगा येथील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन चालू होते त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता मात्र प्रशासनाने ऐनवेळी महामेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे समिती नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे बेळगांव -वेंगुर्ला मार्गावर रस्तारोको केला होता. याबाबत परवानगी न घेता रस्ता रोको केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत 20 समिती नेत्यांवर चंदगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यामध्ये माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, आर. एम. चौगुले, ऍड. एम. जी. पाटील, मदन बामणे, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, सरिता पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, दिनकर पावशे, श्रीपाद अष्टेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, लक्ष्मण मनवडकर, प्रकाश अष्टेकर, मुरलीधर पाटील आदी समिती नेत्यांवर गुन्हा नोंद झाला असून बुधवारी याना चंदगड न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.