Thursday , March 5 2026
Breaking News

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती ट्रेडर्सचे मालक श्री. सुरेश पाटील, गीता इंटरप्राईजेस व संकल्प ट्रेडर्सचे मालक श्री. संजय साबणे, रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे अध्यक्ष श्री. संजीव देशपांडे आणि रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे माजी अध्यक्ष श्री. डी. बी. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या इशस्तवन व स्वागत गीताने झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. बी. पी. काटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रीमती आर. ए. पाटील यांनी शाळेचा अहवाल सादर केला. यानंतर उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुमार संकेत नारायण मंडलिक व कुमारी साक्षी वैजनाथ खाडे तसेच आदर्श विद्यार्थी तुषार रमेश येळूरकर व आदर्श विद्यार्थिनी देवयानी युवराज देसुरकर यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख वक्ते प्रा. एम. बी. निर्मळकर सर यांनी शिक्षणाचे महत्त्व व दहावीनंतर असलेल्या अनेक क्षेत्राविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. व यावर्षी हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे कौतुक करून सर्व शिक्षकांचे व कमिटीचे अभिनंदन केले. तसेच श्री. सुरेश पाटील, श्री. संजय साबने, श्री. संजीव देशपांडे व श्री. डी. बी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून हायस्कूल विषयी कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर शिक्षिका एस. एम. पाटील व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. श्री. नारायण पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर नववीच्या विद्यार्थिनींनी निरोपाचे गीत सादर केले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन श्रीमती एल. पी. झंगरूचे यांनी केले व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. के. झाजरी यांनी केले. तर आभार श्री. एस. टी. तारीहाळकर यांनी मानले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शाळेला बहुमोल अशा देणग्या दिल्या. कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य, प्रायमरी शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *