Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव तहसील कार्यालयाशेजारी काळ्या जादूचा प्रकार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील एका झाडाला काळी बाहुली बांधल्याचा अंधश्रद्धेचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बेळगावातील पूर्वीची रिसालदार गल्ली व आताच्या स्वामी विवेकानंद मार्गावर महानगर पालिकेच्या जुन्या इमारतीत काही वर्षांपूर्वी बेळगाव तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या डाव्या बाजूने पार्किंगसाठी शेड घातले आहे. याठिकाणी पूर्वीपासूनच काही झाडे आहेत. त्यातील एका झाडाला सुमारे फूटभर लांबीची काळी बाहुली लटकत असल्याचा प्रकार आज शनिवारी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. लहान मुलांना खेळण्यासाठी देतात तशाप्रकारची छोट्या टेडी बेअरसारखी असलेल्या या बाहुलीच्या तोंडात दातांची कवळी बसवल्याचे दिसत होते. हे पाहून अनेकांना धक्काच बसला. आज अमावस्या असल्याने कोणीतरी अंधश्रद्धेतून हा प्रकार केल्याची चर्चा सुरु होती. तहसीलदार कार्यालयाच्या तळमजल्यावरच बेळगाव वन नेम्मदी केंद्र आहे. या केंद्रात बेळगाव शहरभरातील व उपनगरातील शेकडो लोक रोज आधारकार्ड दुरुस्ती, लाईटबील व अन्य करभरणा करण्यासाठी येत असतात. काळी बाहुली बांधल्याचा प्रकार पाहून त्यातील अनेकांना धक्काच बसला. अनेकजण घाबरले तर काहींनी कोणीतरी हा खोडकरपणा केला असावा अशी शंकाही बोलून दाखवली. काही असो, महापालिका असताना आणि आता तहसीलदार कार्यालय सुरु झाल्यापासूनच या इमारतीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या पण या घटनेमुळे एकच खळबळ माजली. कार्यालय परिसरात याविषयी दिवसभर उलटसुलट चर्चा रंगली होती.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *