Friday , March 6 2026
Breaking News

‘अंकुर’तर्फे गतिमंद मुलांसाठी 24 ते 26 विविध स्पर्धा

Spread the love

बेळगाव : शहरातील अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेतर्फे सावित्रीबाई फुले समितीच्या सहयोगाने येत्या 24 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये गतिमंद मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले उद्यान, गुरुवार पेठ (मिलेनियम गार्डन समोर), टिळकवाडी येथे या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. गतिमंद मुलांसाठी (स्पेशल चाईल्ड) नृत्य व गायन, चित्रकला आणि रंग कला असे या स्पर्धांचे स्वरूप असणार आहे. स्पर्धेच्या नृत्य व गायन स्पर्धा पहिल्या दिवशी 24 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घेतली जाईल.

एकट्याने आणि सामूहिक अशा दोन प्रकारात नृत्य व गायन स्पर्धा होईल. त्यानंतर 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत चित्रकला व रंगकला स्पर्धा दोन गटात घेतली जाईल. यापैकी 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील गतिमंद मुलांसाठी ध्वजाचे चित्र काढणे आणि रंगवणे हा विषय असणार आहे. त्याचप्रमाणे 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फक्त ध्वज रंगवणे हा विषय असणार आहे. या दोन्ही गटांमध्ये फक्त 10 स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता घेतली जाईल. ही स्पर्धा 5 ते 15 वर्षे वयोगट आणि 15 वर्षे व त्यावरील वयोगट अशा दोन गटात घेतली जाणार असून यामध्ये देखील फक्त 10 स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.

सदर स्पर्धांसंदर्भात गतिमंद मुलांची माहिती अंकुर शाळेमध्ये जमा करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2022 ही आहे. तरी यासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शुभांगी कोरीनकर (9448311373) किंवा शोयब खतीब (9900100709) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *