Saturday , September 21 2024
Breaking News

नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर अनिवार्य : जिल्हाधिकारी नितेश पाटील

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कन्नड भाषा समग्र विकास विधेयक-2022 च्या योग्य अंमलबजावणीबरोबरच प्रत्येक दुकानासमोरील नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलावीत, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी कन्नड भाषा समग्र विकास विधेयक-2022 ची अंमलबजावणी आणि नामफलकांवर कन्नड भाषेचा वापर या विषयावरील जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सरकारने लागू केलेल्या विधेयकानुसार, नामफलकांवर कन्नड 60% आणि इतर भाषा 40% च्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालये, दुकाने यांच्या नावाच्या फलकांवर कन्नड भाषा असावी. या आदेशाची 13 मार्चपर्यंत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती; कन्नड भाषा समग्र विकास विधेयकाची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत आणि बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीत पुरेशी अंमलबजावणी झाली पाहिजे. ते म्हणाले की, काही ठिकाणी कन्नड आणि इतर भाषा 50:50 च्या प्रमाणात आढळतात. अधिकाऱ्यांनी अशा नावाच्या पाट्या तत्काळ बदलून त्या नियमानुसार 60:40 टक्के ठेवाव्यात. बेळगाव हा सीमावर्ती जिल्हा असल्याने बेळगाव शहर व सीमाभागात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगर महापालिकेचे आयुक्त पी.एन. लोकेश, जिल्हा नगर विकास कक्षाचे नियोजन संचालक महांतेश कलादगी, जिल्हा पंचायतीच्या उपसचिव रेखा डोळीनवर, बैलहोंगलच्या प्रांताधिकारी प्रभावती फकीरपूर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा

Spread the love  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *