Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावात हुक्का बारवर पोलिसांचे छापे; 2,56,600 रुपयांचा माल जप्त

Spread the love

 

बेळगाव : राज्यात हुक्का बारवर बंदी असतानाही शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधपणे चालवण्यात येत असलेल्या हुक्का बारवर बेळगाव पोलिसांनी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 2,56,600 रुपयांचे हुक्का व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थांचे घटक कुठून तरी आणून कोणत्याही परवान्याशिवाय ग्राहकांना विकले जात असल्याची माहिती बेळगाव पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती, मार्केट आणि टिळकवाडी पोलिसांनी हुक्का बारच्या दुकानावर छापे टाकले. छाप्यादरम्यान 75,500 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 126 हुक्के, 62 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 51 रोल पेपर, 15,500 रुपये किमतीचे 30 विविध कंपन्यांचे चारकोल,
20,300 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांचे 120 बोँग पाईप, 41,500 रुपये किमतीचे विविध कंपन्यांची विदेशी सिगारेटची 25 पाकिटे. 25,300 रुपये किमतीची विविध कंपन्यांची तंबाखूची पाकिटे, 16,500 रु. किमतीच्या विविध कंपन्यांच्या फ्लेवर्स सिगारेट असा एकूण 2,56,600 रुपये किमतीचे हुक्का साहित्य जप्त करण्यात आले. या संदर्भात आरोपी अबुबकर जैनब सिद्दीक (वय 31) आणि शाबाज शकील अहमद (वय 22, रा. मूळ मंगळुर, सध्या अनगोळ) यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एसीपी सदाशिव कट्टीमणी, सीपीआय कपिलदेव व सहकाऱ्यांनी भाग घेतला.

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना डीसीपी रोहन जगदीश म्हणाले की, काल बेळगाव पोलिसांची 3 पथके तयार करून 3 ठिकाणच्या अवैध हुक्का बारवर छापे टाकण्यात आले. त्यात माळमारुती पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हापूर सर्कलमधील युनिक शॉप आणि टिळकवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील द स्मोक शॉप व आणखी एका हुक्का बारवर छापे टाकण्यात आले. याठिकाणी अवैधरित्या परदेशी सिगारेट्स आणि नशा आणणाऱ्या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत होते. यापूर्वी, सरकारने अंमली पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली असूनही अवैधरित्या हुक्का बार चालविण्यात येत होते. त्यांच्यावरील छाप्यात १२६ हुक्के, विविध कंपन्यांचे ५१ रोल पेपर, 30 वेगवेगळ्या कंपनीचे चारकोल, विविध कंपन्यांचे 120 बोँग पाईप, विदेशी सिगारेटची पाकिटे, विविध कंपन्यांची तंबाखूची पाकिटे असा एकूण 2,56,600 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे सीपीआय कपिलदेव ए. एच., पीएसआय के. पी. चंदावरकर यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *