बेळगाव : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार अखेर जाहीर झाला असून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीतही बेळगाव आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर न झाल्याने या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत गोंधळ सुरू आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुक असून बेळगाव भाजपचे तिकीट कोणाला मिळणार या प्रश्नाने मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.