
बेळगाव : डॉ. सतीश नरसिंग यांची युवा सेना सीमाभागाच्या विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल बेळगावमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेची संपुर्ण सीमाभागातील व्यापक बैठक बेळगावमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.
यावेळी बेळगाव, निपाणी, खानापुर, चिक्कोडी अशा बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव जिल्ह्यात दोन्ही लोकसभा क्षेत्रात युवा सेनेचे काम खुप आधीपासुन चालु आहे. बेळगाव मतदारसंघाचा बेळगाव विभाग व निपाणी-चिकोडी लोकसभा मतदारसंघाचा निपाणी विभाग अश्या दोन्ही ठिकाणी युवा सेनेने गेल्या ८-९ वर्षापासून अनेक लोकउपयोगी सामाजिक उपक्रम, युवकांच्या प्रश्नावर आंदोलन करत आपली छाप टाकली आहे. मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही युवा सेना त्या ठिकाणी सतत कार्यरत आहे. युवा सेनेचे सर्वच स्तरातून यासाठी कौतुक होते. शिवसेनेतील बंडावेळीही सीमाभागातील सर्व युवा सैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीले व एकही शिवसैनिक फुटु दिला नाही. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या धाडसी नेतृत्वावर अनेक तरुण युवा सेनेकडे आकर्षीत होत आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार या युवकांच्या मुलभुत प्रश्नावर आजपर्यंत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या युवा सेनेने आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्याने बेळगाव जिल्ह्यातील युवा सेनेची “राजकीय” ताकद या बैठकीच्या निमित्ताने दिसुन आली.
सध्याचे वातावरण पाहता सीमाप्रश्नाकडे झालेली उदासीनता पाहुन सीमाभागात ही ”ठाकरेंची यंग ब्रिगेड“ ॲक्शन मोडवर येण्याच्या तयारीत आहे. लवकरच युवा सेनेचा विस्तार पुर्ण सीमाभागात करण्याची तयारी ही सुरु आहे. युवा सेनेचे विनायक हुलजी, ऋषिकेश सौंदलगेकर, सोमनाथ सावंत, मयांक पावशे, वैभव कामत, अद्वैत चव्हाण-पाटील, उमेश पाटील, श्वेता तवशेट्टी, ओमकार बैलुर, प्रणव बेळगांवकर, अमेश देसाई, प्रसाद मनसे, वैष्णव जाधव, शुभम कांबळे, चैतन्य होनगेकर उपस्थित होते.
नव्या विस्तारकांचा निवडीबद्दल सत्कार
युवा सेनेचे सीमाभागातील काम पाहत युवा सेना सचिव वरुण जी सरदेसाई यांनी सीमाभागासाठी डॉ. सतीश नरसिंग यांची विस्तारक पदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल युवा सेना सीमाभागाने त्यांचा सत्कारही केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, समितीचे युवा नेते शुभम शेळके, दिलीप बैलूरकर, सुरज कणबरकर तसेच आजी- माजी शिवसेनेचे पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta