बेळगाव : बेळगावातील आर.एन. शेट्टी कॉलेज सर्कलजवळ कार चालकाने केएसआरटीसी चालकावर एअर गन दाखविल्याची घटना दुपारी घडली.
याबाबत माहिती अशी की, एक कार केएसआरटीसी बसच्या विरुद्ध दिशेला आली. त्यावेळी कारमध्ये असलेल्या आझम नगर येथील मोहम्मद शरीफ याची आणि केएसआरटीसी बस चालक मल्लिकार्जुन यांच्याशी शाब्दिक शिवीगाळ झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. परिस्थिती गंभीर बनल्याने शरीफ यांनी एअर गन दाखवून गुंडगिरी दाखवली.
या संदर्भात माळमारुती ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शरीफ याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असून, त्याच्याकडे असलेल्या एअर गनचा परवाना आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला आहे.