
बेळगाव : बेळगावातील प्रसाद होमिओ फार्मसीतर्फे यंदा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित ”आरोग्य सेवा भूषण पुरस्कार” वितरण समारंभ हॉटेल यूके27 द फीर्न येथे नुकताच दिमाखात पार पडला.
सदर शानदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून युनियन बँकेच्या विभागीय प्रमुख आरती रौर्नियार आणि प्रसिद्ध डॉ. नीता देशपांडे या उपस्थित होत्या. समारंभात कर्तबगार 32 महिला होमिओपॅथिक डॉक्टर्सना आरोग्य सेवा भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या आरती यांनी महिलांनीच महिलांना प्रोत्साहन देणे व विकासासाठी मदत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. नीता यांनी डॉक्टरांनी सदैव काळाच्या पुढे राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रसाद होमिओ फार्मसीचे संचालक प्रतिभा व प्रसाद घाडी तसेच चंद्रकला व परशुराम घाडी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी कंपनीच्या विकासाचा आढावा घेणारे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यावेळी बेळगावात 2 दुकाने, एक पॉलीक्लिनिक , ऑनलाईन वितरण व स्वतःची healthyghar.com ही वेबसाईट असणारी प्रसाद होमिओ फार्मसी ही कंपनी सध्या एका तासात बेळगावात तर दोन दिवसात राज्यात कुठेही औषधे पोचवते. पुढील काळात बेळगावसह आजूबाजूच्या राज्यात रिटेल आउटलेट चेन सिस्टीम सुरू करणार आहेत अशी माहिती देण्यात आली. शेवटी कु. सोयरा घाडी हिने आभार मानले. कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta