
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची बेंगळुर येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

मृणाल हेब्बाळकर हे ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु आहे. आपल्याला तिकीट देण्यासंदर्भात मृणाल हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांची भेट घेतली आणि दोघांचे आभार मानले. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोघांनीही मृणाल हेब्बाळकर यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta