Friday , November 22 2024
Breaking News

समिती कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना पत्र…

Spread the love

 

बेळगाव : लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच जाहीर झाली आहे, महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना सीमावासीयांना आपण विसरू नये. गेली ६८ वर्षे सिमावासीय पारतंत्र्यात असल्यासारखे जगत आहेत, भाषिक अत्याचार आम्ही सहन करत आहेत, कर्नाटक सरकारने १९८६ साली शिक्षणात कन्नडसक्ती लागू केलीच, पण गेल्या महिनाभरापूर्वी कन्नडसक्ती कायदा पारित करून येथील कानडीकरणाचा वरवंटा अजून तीव्र केला आहे व व्यवहारिक दृष्ट्या ही कन्नदसक्ती लादली आहे, त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने आपण आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाची सोडवणूक व सीमाभागात होणारी भाषिक सक्ती हा विषय समाविष्ट करावा, व महाराष्ट्रातील आपल्या सर्व उमेदवारांना यामुद्द्यावर जाहीर सभेदरम्यान भाष्य करण्यास आदेश देण्यात यावेत, जेणेकरून सीमावासीयांना यातून पाठबळ मिळेल व हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत, नव्या लोकप्रतिनिधींनीलोकसभेत तो चर्चिला जाईल व यातून सिमाप्रश्नाची सोडवणूक होईल अशी आमची आशा आहे.आशा आशयाची पत्रे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यानी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पक्षप्रमुखांना पाठविली आहेत, तसेच उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारांना हे पत्र इमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे, बळवंत शिंदोळकर, प्रकाश हेब्बाजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *