बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न व आरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाच्या एकत्र करण्यासाठी आगामी मंगळवार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगाव येथील जाहीर सभेसाठी नियोजनाची बैठक शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे शनिवारी दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज आणि मराठी संघटनांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.