बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे श्री. अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. महादेव पाटील (बेळगाव) व श्री. निरंजन सरदेसाई (कारवार) यांच्या प्रचारार्थ सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व समितीला भरघोस मतदान करून आपलं अस्तित्व अबाधित राखावे असे आवाहन करण्यात आले.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराची वाचा फोडण्यासाठी मराठी भाषिकांनी लोकशाही पद्धतीने आपली भावना व्यक्त करणे गरजेचे असून त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीर राहणे गरजेचे आहे, असे मत अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडूचकर, भरमा पाटील, महांतेश अलगोंडी, महेश जाधव, विनायक जाधव, रणजित हावळनाचे, आकाश भेकणे, निखिल देसाई, आनंद पाटील, आदी उपस्थित होते.
सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले चिटणीस प्रतिक पाटील यांनी आभार मानले.