बेळगाव (वार्ता) : येथील भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. हा लसीकरण उपक्रम उचगाव आरोग्य केंद्रातर्फे राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी वाय. पी. नाईक उपस्थित होते.
प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उचगाव आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. स्मीता गोडसे यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. स्मीता गोडसे यांनी, आरोग्य महत्वाचे असून रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. कोणता तरी खेळ खेळणं गरजेचे असून प्रत्येकाने कोरोना यशस्वी करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. उचगाव परिसरात लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे, आरोग्य सांभाळा, काळजी घ्यावी असे मौलिक विचार व्यक्त करून समाधान व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सी. जी. अग्नीहोत्री, आशा वर्कर्स, सिस्टर कर्मचारी वर्ग उपस्थित राहुन सहकार्य केले.
आरोग्य केंद्रातील सर्व सहकार्यांना कॉलेजतर्फे धन्यवाद देण्यात आले.
याप्रसंगी वाय. पी. नाईक, डॉ. स्मीता गोडसे, प्राचार्य आनंद आपटेकर यांनी आरोग्य विषयक मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण भारतभर अशा प्रकारे पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण देण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांना लसीकरण अभियान यशस्वी केला आहे.
यावेळी व्यासपीठावर पांडुरंग नाईक, प्रा.मनीषा आपटेकर, सी. जी. अग्नीहोत्री हजर होते.
सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी, आभार प्रा. मनीषा आपटेकर यांनी मानले.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …