Wednesday , December 6 2023
Breaking News

विमल फाऊंडेशन आयोजित भव्य कबड्डी, खो-खो स्पर्धेचे 16 जानेवारी रोजी आयोजन

Spread the love

बेळगाव (वार्ता) : महाद्वार रोडवरील श्री धर्मवीर संभाजी उद्यानाच्या मैदानावर विमल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्यावतीने दुसर्‍या विमल जाधव स्मृती चषक खुल्या कबड्डी व खो-खो पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन रविवार ता. 16 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता प्रारंभ होणार आहे अशी माहिती विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी दिली आहे.
सदर स्पर्धा एक गाव एक संघ असून पुरुष गटातील विजेत्या संघाला रोख 20 हजार व चषक, उपविजेत्या संघाला रोख 15 हजार व चषक, तिसर्‍या क्रमांकाला रोख 10 हजार चषक व चौथ्या क्रमांकाला 5 हजार चषक, तर महिला गटातील विजेत्या संघाला रोख 10 हजार, उपविजेत्याला 7000, तिसर्‍या क्रमांकाला 5000, पदक प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक बक्षिसे अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट रायडर, उत्कृष्ट कॅचेर, तर पुरुष खो-खोतील विजेत्या संघाला रोख 15 हजार, उपविजेत्याला रोख 10 हजार, तिसरा क्रमांकाला 7 हजार, चौथ्या क्रमांकाला 4 हजार व महिला गटातील विजेत्याला रोख 10 हजार उपविजेत्याला 7 हजार, तिसर्‍या क्रमांकाला 3 हजार, चौथ्या क्रमांकाला 2 हजार चषक पदक प्रमाणपत्र तर उत्कृष्ट चेझर, उत्कृष्ट रनर, सर्वोत्तम खेळाडू अशी आकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी इच्छुक संघानी आपली नावे शुक्रवार ता. 14 जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खो-खो प्रशिक्षक नारायण पाटील कडोली, नितीन नाईक बेळगाव, कबड्डी आर. एल. पाटील, ए. व्ही. हुलजी, अरुण बोळशेट्टी, उमेश बेळगुंदकर बालिका आदर्श, चंद्रकांत पाटील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ, विवेक पाटील ठळकवाडी शाळा टिळकवाडी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विमल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती डोंगरावर धार्मिक पर्यटन विकासाला संधी

Spread the love  मंत्री एच. के. पाटील यांची विधानसभेत माहिती बेळगाव : शासनाने राज्यातील महत्त्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *