बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज मंगळवारी सकाळी ७ वाजता बेळगावसह राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रारंभ झाला असून दुपारी १ वाजेपर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ मतदान झाले.
बेळगाव जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. विश्वेश्वरय्यानगर येथील कन्नड प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्र क्र. ३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक मतदान केले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या सेल्फी पॉईंटवर स्वतःचे छायाचित्र देखील काढून घेतले. जिल्ह्यातील ४५२४ मतदान केंद्रांमध्ये आज लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघात १३ तर चिकोडी लोकसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणाऱ्या मतदानाद्वारे ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.
या मतदानच बटन दाबून आम्ही आशा अनेक योजनांच्या भूतला बाहेर काढून जे आपल्या सुखा सोबत, भ्रष्टाचाराच्या अनेक भूतांना जागृत करून आपल्याच मानगूटीवर बसवून घेणार आहोत.वंदेमातरम
जैसे इलाज करो आपना ………….. बघा कुणा कुणाला काय काय वाटतय ते.वंदेमातरम
या मतदानच बटन दाबून आम्ही आशा अनेक योजनांच्या भूतला बाहेर काढणाार जे आपल्या सुखा सोबत, भ्रष्टाचाराच्या अनेक भूतांना जागृत करून आपल्याच मानगूटीवर बसवून घेणार आहोत.वंदेमातरम
जैसे इलाज करो आपना ………….. बघा कुणा कुणाला काय काय वाटतय ते.वंदेमातरम