कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत, सवलत प्रवेश योजना राबविण्यात येणार आहे. याचा ८६५ मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सवलत प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी २५ टक्के शुल्क माफ सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसतीगृहासाठी पूर्णतः फी माफ करण्यात आली आहे.
सदर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात इच्छूक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनासाठी दि. ९ मे रोजी सकाळी ११.३० वाजता देवचंद महाविद्यालय (निपाणी), दि. १३ रोजी सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज भालकी (जि.बिदर), दि. १४ रोजी सकाळी १०.३० वाजता शिवस्मारक स्थळ (खानापूर) तर दुपारी ३.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, खानापूर रोड, बेळगाव येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याठिकाणी विद्यापीठाने दिलेल्या विहीत वेळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.