Friday , November 6 2026
Breaking News

हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Spread the love

 

हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

हैदराबादमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येलाही सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपत्ती निवारण दल पाणी साचलेल्या भागात पाठवण्यात आले आहे, जे पाण्याचा निचरा करण्याचे आणि कोसळलेली झाडे काढण्याचे काम करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *