बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर स्मशानभूमी हि अव्यवस्थेचे आगार बनली असून अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सदाशिवगर स्मशानभूमीत सुधारणा करण्यासंदर्भात वृत्त प्रकाशित होत आहे. मात्र केवळ आश्वासने देऊन अद्याप स्मशानभूमीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या स्मशानभूमीत शेडची सोय करण्यासाठी अनेक महिन्यांपासून मागणी होत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना शेडविना अडचणी निर्माण होत आहेत. काही दिवसात पावसाळा सुरुवात होईल. तत्पूर्वी याठिकाणी शेडची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी माजी महापौर आणि समाजसेवक विजय मोरे तसेच फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta