
बेळगाव : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ वाटप करून आकर्षक पद्धतीने शाळा सजवून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला.
दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला. आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला असून शाळांचे आवार मुलांच्या किलबिलाटाने गजबजले. बेळगावमधील सरदार्स हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या स्वागतकमानी आकर्षकपद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून याच कामात व्यस्त असणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. मिठाई आणि खाऊवाटप करत मुलांसोबत शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला.
यावेळी वनिता महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, आजपासून शाळा सुरू झाल्या असून दीड महिन्याच्या सुट्टीनंतर मुले शाळेत आली आहेत, 2026 मध्ये वनिता महाविद्यालय 100 वर्षे पूर्ण करणार आहे. आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून विद्यार्थ्यांमुळे आज उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta