बेळगाव : सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा येथे शाळा प्रारंभोत्सव खुप मोठ्या उत्साहात व वेगळ्या रीतीने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामदेवता दुर्गा देवीची ओटी भरण्यात आली. नंतर बैलगाडीमध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांना बसून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. नंतर आत येताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन औक्षण करुन फुल देऊन अंकलपी आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. सरस्वती पूजन करुन मुलांना पुस्तके वाटण्यात आली. गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका सौ ए. ए. पाटील, श्री. व्ही. एस. कंग्राळकर, श्री. ए. बी. पागद, सौ. टी. व्ही. पाटील, सौ. आर. बी. लोहार, सौ. आर. बी. मगदूम, एस. डी. एम. सी. अध्यक्ष श्री. मोहन हरजी तसेच उपाध्यक्षा सौ. सुनीता जत्राटी, सौ. रेश्मा हुच्ची, श्री. दिपक जाधव, श्री. अशोक लोहार, श्री. लक्ष्मण जोई, श्री. अनिल चौगुले, श्री. तानाजी कलखांबकार, श्री. यल्लाप्पा हरजी, श्री. अशोक गिरमाल, श्री. महेश जत्राटी, सौ. दिपाली धर्मोजी, सौ. सुधा गिरमाल, सौ. सविता सोनजी, सौ. पूजा लोहार, सौ. सुजल शिरल्याचे, सौ. रुपाली गुरव, सौ. ज्योती चुनारी आदी उपस्थित होते.