बेळगाव : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरण बॅकवॉटर विभागाच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यालयाबाहेर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
कुमार बसय्या धुमकीमठ (४९) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी काल रात्री उशिरा विभागाच्या आवारात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला.
जवळपास 20 वर्षे सरकारी नोकरीत असलेले कुमार गेल्या तीन महिन्यांपासून कामावर न येता रजेवर होते. या घटनेसंदर्भात अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही.