बेळगाव : लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि. ४ जून रोजी मतमोजणी केंद्राच्या परिसरातील कांही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे.
एसकेई भंडारी कन्नड माध्यम शाळा, एसकेई भंडारी मराठी माध्यम, डिव्हाईन प्रॉव्हिडन्स इंग्रजी माध्यम, स्वाध्याय विद्यामंदिर शाळा, टिळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श विद्यालय, केएचपीएस क्रमांक: 5 एमएचपीएस क्रमांक 8, ठळकवाडी, जी जी चिटणीस, हेरवाडकर, गोमटेश विद्यापीठ, केएलएस पब्लिक स्कूल, जैन हेरिटेज स्कूल, गोमटेश कॉलेज, केएलएस गोगटे कॉलेज, आर.एल. लॉ कॉलेज, आरपीडी कॉलेज, इंदिरागांधी मुक्त विद्यापीठ, जैन महाविद्यालय, प्रेरणा महाविद्यालय आदी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta