
बेळगाव : बेळगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दिनांक ६ जून रोजी छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा आरती करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शहापूर विभाग शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta