बैलहोंगल : बैलहोंगल शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रायण्णा सर्कलमधील रस्त्यावर पाणीच पाणी झाले, त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली.
शुक्रवारीही पाऊस सुरूच राहिल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने वाहनधारक बऱ्याच ठिकाणी अडकून पडले. काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. पाणी गुडघ्यापर्यंत आल्याने दुकानदारांनी पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड केली. श्रीनगरमधील सुमारे सहा घरे पुरात वाहून गेली. दीपा हॉटेल पुढील रस्ता, बसस्थानक, हिंभाग, संगोळी रायण्णा सर्कल, साईबाबा मंदिर रोड, दोड्डकेरे रोड, होसूर रोड या मुख्य रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप आले होते. शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. सर्वसाधारणपणे जनजीवन विस्कळीत झाले.